रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’ च्या ‘एक्सलन्स ‘पुरस्कारांचे १५ जानेवारी रोजी वितरण


‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’ च्या**’एक्सलन्स ‘पुरस्कारांचे १५ जानेवारी रोजी वितरण
*पुणे :’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘च्या ‘व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्डस्, सर्व्हिस एक्सलन्स अॅवार्ड स् २०२३ ‘चे वितरण रविवार, १५ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
ज्येष्ठ सनदी लेखापाल भूषण तोष्णीवाल आणि डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अॅवार्डस्’ देण्यात येणार आहे. दृष्टीहीन कल्याण संघ या संस्थेला ‘सर्व्हिस एक्सलन्स अॅवार्ड ‘देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते आणि रोटरीचे माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
गांधी भवन, कोथरूड येथे संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या अध्यक्ष पद्मजा जोशी, सचिव अश्वीनी शिलेदार आणि निमंत्रक पल्लवी दोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली