पुण्याच्याही नामांतराची मागणी?झाली असून त्यावर मूळ पुणेकरांची इच्छा,अपेक्षा काय:अजीत पवार

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – पुण्याच्याही नामांतराची मागणी झाली असून त्यावर विचार करताना सरकारने मूळ पुणेकरांची काय इच्छा,अपेक्षा आहे,हे पाहिले पाहिजे,असे ते म्हणाले. त्यांना विश्वासात न घेता बाहेरच्यांनी नामांतराचे सल्ले देणे अडचणीचे ठरते,असा टोला त्यांनी लगावला

. नामांतराचा मुद्दा हा काहींच्या दृष्टीने भावनिक असल्याने त्यावर बोलणं आम्हाला ( राजकीय नेत्यांना)अडचणीचं ठरतं,अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप झाला आहे

प्रचंड वाढलेली महागाई आणि बेरोजगारीवरील लक्ष विचलित करण्याकरिता नामांतरांचे मुद्दे पुढे आणले जात आहेत, असा हल्लाबोल अजितदादांनी यावेळी केला

.. त्यातूनच त्यांनी शहरात केबल इंटरनेट टाकण्याचे काम गु्न्हेगारांशी सबंधित कंपनीला त्याला असलेला विरोध डावलून दिल्याने चार महिन्यांतच आयुक्तांचा कारभार वादात सापडला आहे.त्यावर बोलताना सध्या प्रशासकीय राजवट असल्याने कुणाच्याही दबावाखाली आयुक्तांनी काम न करणे अपेक्षित असल्याचे अजितदादा म्हणाले

.आता पदाधिकारी नसल्याने त्यांच्यावर कुणाचा दबाव नाही.त्यामुळे त्यांच्या कारभाराला तेच जबाबदार राहणार आहेत,असे आय़ुक्तांचे कानही त्यांनी टोचले. कोयता गॅंगच्या पुण्यातील उच्छादाचा प्रश्न विरोधी पक्षनेते यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मांडला होता. त्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील कोयता गॅंगच्या उपद्रवावर भूमिका मांडताना या शहरासह राज्यात इतरत्र कायदा व सुव्यवस्था गंभीर झाल्याचे मत शनिवारी (ता.१४) व्यक्त केले

.दरम्यान, उपमुख्यमंत्री यांनी आजच पुण्यात ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेतला. त्यात त्यांनी संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा आदेश दिला. वाळू, दारु तस्करी करणाऱ्यांवरही कडक प्रहार करण्यास सांगितले

पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयात मावळात शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन कोयता दोन गॅंगने दहशत माजविण्याचा प्रयत्न नुकताच केला.त्यामुळे पिंपरी-चिंचवडच नव्हे,तर राज्यात इतर काही ठिकाणचीही कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाले असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. म्हणून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने लक्ष दिले पाहिजे,असे ते म्हणाले

Latest News