डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कारवाई…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – डॉ. सुधीर तांबे म्हणाले, ‘ काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही’. तर दुसरीकडे सुधीर तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे
. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ऐनवेळी अर्ज दाखल न केल्यामुळे काँग्रेस पक्षाने कारवाई केली आहे.काँग्रेसने डॉ. तांबे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे.
पक्षाने कारवाई केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहेयावरून तांबे म्हणाले, ‘मी भाजपा मध्ये जाणार चर्चा खरी नाही. आम्ही भाजपाला पाठिंबा मागितला नाही. मी पक्षाविषयी काहीही बोलणार नाही. मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाईलटीडीएफ या शिक्षक संघटनेच्या पाठिंब्यावर भाष्य करताना तांबे म्हणाले, ‘टीडीएफ शिक्षक संघटनेने मला पहिल्यापासून पाठिंबा दिला.
प्रत्येक संघटनेची एक कार्यपद्धती असते, त्यानुसार त्यांचा निर्णय होईलदरम्यान, डॉ. सुधीर तांबे यांनी शिस्तभंग कारवाईनंतर ट्विट करत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, अशा आशयाचे ट्विट डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.