चंद्रकांत पाटील यांचं कोथरूडमध्ये योगदान काय ? – शरद पवार


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – शरद पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांचं कोथरूडमध्ये योगदान काय होतं? जो माणूस आपल्या जिल्ह्यात निवडून आला नाही, त्यांना काय बोलायचं. चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस, असा टोला शरद पवारांनी लगावला
शरद पवार पुढे म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान गृहस्थ आहे. त्यांचे घर कोल्हापूरला आणि ते निवडणूक कोथरूडमधून लढले. त्यांना त्यांचं गाव सोडून कोथरूडमध्ये यावं लागलं. त्यांचं कोथरूड मध्ये काय योगदान? त्यांच्यावर काय भाष्य करावं?, असा जोरदार घणाघात शरद पवार यांनी (Chandrakant Patil) यांच्यावर केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. दुसरीकडे शरद पवार देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहे. आजही पुण्यात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा शरद पवार यांनी सत्कार केला.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची खासदार यांच्यासोबत मोदीबागेत भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.नाशिक पधवीधर निवडणुकीतील राजकारणावर शरद पवार म्हणाले, ‘माझी कुणाशी चर्चा झाली नाही. हे चित्र जे दिसतं आहे, काळजी करण्यासारखे आहे. मला जागेबाबत माझ्या पक्षाने कळवलं होतं.
आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचं ठरवलं होतं. नागपूरमध्ये आम्ही सेनेला पाठिंबा देऊ. नाशिक बाबतीत मला अधिक माहिती नाही’.’काँगेसने ज्याला तिकीट दिलं होते, त्यांनी काम देखील केलं आहे. त्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्याला संधी दिली. तांबे हे काही पक्षाच्या बाहेरचे नाहीत. बसून वाद मिटवता आला असता, अजून देखील वाद मिटवता येऊ शकतो. जे घडलं ते नाकारता येणारं नाही. थोरात पक्षाचे मोठे नेते आहे, असे पवार पुढे म्हणाले.