नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या 16 उमेदवार रिंगणात…

नाशिक (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- काँग्रेसने रविवारी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसमधून निलंबित केल्याचे घोषित केले. त्या अनुषंगाने सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. यापूर्वी भाजपकडून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांचे नाव अचानक चर्चेत आले. सत्यजित तांबे यांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी व भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही.

शिवाय अन्य कुणालाही पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.हे पाहता शुभांगी पाटील यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

. काँग्रेसनेही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता दुपारी तीन वाजेपर्यंत सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यातही शुभांगी पाटील यांचा मोबाईल तासभर नॉट रिचेबल होता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. माघारीच्या दिवशी आता १६ उमेदवार आता रिंगणात असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिली.

डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल बाळासाहेब खाडे, दादासाहेब पवार, धनंजय जाधव, राजेंद्र निकम, धनराज विसपुते या सहा उमेदवारांनी माघार घेतली. नाशिक विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी माघारी घेतल्यानंतर रिंगणात अपक्ष सत्यजित तांबे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून एकही उमेदवार नसल्याने तांबे यांच्यासमोर फारसे मोठे आव्हान नसल्याचे दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे महाविकास आघाडीमध्ये उमेदवाराबाबत अद्यापही गोंधळ आहे. या तीन पक्षांतील सावळा गोंधळ आहे. दुसरीकडे तांबे यांचे तळागाळातील नेटवर्क, कामाचा अनुभव व संघटन कौशल्य यामुळे तांबे हे किती मतांनी निवडून येतात एवढीच उत्सुकता निवडणुकीत शिल्लक राहिली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जानेवारी अखेरीस मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे व माघारीची प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. सत्यजित यांनी अपक्ष व काँग्रेस असे दोन अर्ज दाखल केले होते.

हे उमेदवार रिंगणात

सत्यजित सुधीर तांबे (अपक्ष), रतन कचरु बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी) अनिल तेजा (अपक्ष), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर (अपक्ष), अविनाश महादू माळी (अपक्ष), इरफान मो इसहाक, (अपक्ष), ईश्वर पाटील (अपक्ष), बाळासाहेब घोरपडे (अपक्ष), ॲड. जुबेर नासिर शेख (अपक्ष), ॲड.सुभाष राजाराम जंगले (अपक्ष), नितीन सरोदे (अपक्ष), पोपट बनकर (अपक्ष), शुभांगी पाटील (अपक्ष), सुभाष चिंधे ( अपक्ष) ,संजय माळी (अपक्ष).

जिल्हानिहाय मतदार

नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्यात ३३८ बूथ कार्यान्वित केले जाणार आहेत. नगर जिल्ह्यात एक लाख १५ हजार ६३८,नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२ तर नंदुरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ मतदार असून पाच जिल्ह्यात एकूण २६२७३१ मतदार आहेत.

Latest News