शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, उद्या निर्णय:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

नागपूर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -बुधवारी महाविकास आघाडी यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात कुणाला पाठइंबा द्यायचा यावरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातही काँग्रेसच्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत, असं संजय राऊत म्हणालेत राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

.यावरून नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे काही काँग्रेसचे प्रवक्ते नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची नाही.

शुभांगी पाटील यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर आम्ही उद्या निर्णय देऊ, असं नाना पटोले म्हणाले.अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहकारी कारखान्यात निवडणूक असल्यामुळे ते बिझी आहेत. मात्र उद्या फोनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संपर्क साधणार आहोत

. त्यानंतर महाविकास आघाडीचा पाठिंबा कुणाला आहे, हे ठरेल, असं अजित पवार म्हणाले.डॉ. सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून मागील तीन टर्म निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीने एकमताने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलल्याने हा सगळा गोंधळ झाल्याचं अजित पवार म्हणाले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील चुरस दिवसेंदिवस वाढतच आहे. किंबहुन राज्याच्या राजकारणात सध्या ही निवडणूकच चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे ) यांनी ऐनवेळी दगाफटका केल्याने पक्ष श्रेष्ठींद्वारे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्याविरोधातही कारवाई झाल्याचे संकेत आहेत. आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरेगटाने पाठिंबा दिल्याचे स्वतः पाटील यांनीच सांगितले आहे. पण महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळतोय का, याकडे सर्वांचं लक्ष आहे

Latest News