सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार:आशिष देशमुख


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे पक्षावर नामुष्की आली आहे. सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीला नाना पटोले हेच जबाबदार आहेत. एक मोठा राजकिय पक्ष आज आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे
महाराष्ट्र काँग्रेसमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवा खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थिती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे महाराष्ट्र अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे.
यासाठी आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देखील लिहिलं आहे.सकारात्मक कार्य करत नाही. गेल्यावेळी नागपूर विधानपरिषद जागेवर वेळेवर रविंद्र भोयर यांना बदलण्यात आलं
. शिंदे -फडणवीस सरकार बहुमत चाचणीच्या वेळेस काँग्रेसचे १० आमदार अनुपस्थित होते, त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झालेली नाही. म्हणूनच राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी तात्काळ प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज आहेआशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे.