महानगरपालिकेतील स्थापत्य विभागात 40 टक्के पेक्षा कमी दराने झालेल्या विकास कामाची (कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे) करणार चौकशी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थापत्य विभागात 40 टक्के पेक्षा कमी दराने झालेल्या विकास कामाची (कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे) करणार चौकशी
पिंपरी: विनय लोंढे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) महापालिकेत 40 % पेक्षा कमी दराने काम करणाऱ्या ठेकेदाराची व झालेल्या कामाची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थापत्य विभागात 40 टक्के पेक्षा कमी दराने झालेल्या विकास कामाची कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे हि संस्था चौकशी करून एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश आयुक्तानी दिले आहेत
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पालिके कडे बघितल जाते त्यामुळे पालिकेत काम घेण्यासाठी मोठी फिल्डिंग ठेकेदाराकडून लावली जाते त्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाण्याची तयारी त्याच्या कडून केली जाते त्याचा एक भाग म्हणून बिलो काम करण्याची प्रथा रूढ होताना दिसत आहे स्थापत्य विभागाची कामे विशिष्ट ठेकेदारानाच मिळाली जातात अशा तक्रारी आयुक्ता कडे आल्या होत्या
त्या अनुषंगाने आयुक्त शेखर सिंह यांनी शहर अभियंता मकरंद निकम यांना आदेश देवून स्थापत्य विभागात 40% पेक्षा बिलो काम केलेल्या कामाची यादी मागवून त्या कामाची व ठेकेदाराची चौकशी करण्याचे काम कॉलेज ऑफ इंजिनीरिंग यांना दिले आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेल्या पाच ते सात वर्षांपासून काम करणाऱ्या ठेकेदारमध्ये कमी दराने (बिलो ) काम करण्यासाठी जणू काही शर्यत लागली त्यासाठी वाटेल त्या स्तरावर ठेकेदार जाण्यासाठी तयार असतात त्यामुळे बिलो काम करण्याचे प्रथा सुरु झाली आहे
आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेत 40% बिलो काम करणाऱ्या ठेकेदाराची व केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी काही राजकीय कार्यकर्ते व माजी नगरसेवक यांनी केली होती
आठ प्रभागातील मिळून स्थापत्य विभागातील 20 कामाची सध्या चौकशी सुरु असून त्याचा अहवाल येत्या पंधरा दिवसात आयुक्त शेखर यांना मिळणार असून त्यानंतर त्या संबधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले
पालिकेत कमी दराने काम केल्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट राहत असून फक्त महापालिकेत काम घेण्याच्या हट्टापायी ठेकेदार वाटेल त्या पर्यायाचा वापर करून काम मिळवितात.कामाचा दर्जा चांगला देत नाहीत अश्या तक्रारी पालिके कडे प्राप्त झाल्याने प्रशासनाला कामाची चौकशी करावी लागत आहे
त्यामुळे शहरातील विकास कामाचा दर्जा सुधारेल आणि बोगस कामे,महापालिकेतील प्रभाग ( E प्रभाग 5 कामे ) ( K :प्रभाग 3 कामे) (G.प्रभाग 2 कामे) (H प्रभाग 3 कामे) ( B. प्रभाग 3 कामे ) (D. प्रभाग 2 कामे) (A. प्रभाग 1 कामे ) (F. प्रभाग 1 कामे ) अश्या कामाची यादी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग यांना चौकशी साठी देण्यात आले आहेत
कॉलेज ऑफ इंजिनीरिंग ला 20 कामाची चौकशी करून सर्व टेस्टिंग रिपोर्ट साठी पालिकेने 1लाख 43 हजार 602 रुपये अशी फी म्हणून देण्यात आली आहे इथून पुढे कोणत्याही ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे काम करू नये या साठी सगळ्या प्रकारांची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे