चिंचवड व कसबा विधानसभा मतदार संघात 27 फेब्रुवारी ला पोटनिवडणूक मतदान

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूक ) होणार आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने ) पोटनिवडणुक जाहीर केली आहे

. येत्या 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अधीसूचना जारी करण्याची तारीख – 31 जानेवारी 2023उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023दाखल अर्जांची छाणणी – 8 फेब्रुवारी 2023उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023मतदानाची तारीख – 27 फेब्रुवारी 2023मतमोजणीची तारीख – 2 मार्च 2023

Latest News