कसबा पोटनिवडणुक संधी दिली मिळाली, तर नक्कीच लढवणार- शैलेश टिळक


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )
– मुक्ता टिळकांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केलं आहे. त्यांचं कसबा मतदारसंघासाठी काम पाहता, ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा, पक्षाकडून आम्हाला संधी दिली मिळाली, तर नक्कीच आम्ही ही निवडणूक लढवणार अशी भावना शैलेश टिळक यांनी व्यक्त केली.
मी अनेक वर्ष मुक्तासोबत काम केलेल आहे, कुणाल देखील चांगलं काम करत आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी पोटनिवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर आमच्याच घरात उमेदवारी मिळावी, ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील,” असे शैलेश टिळक यांनी म्हंटले आहे
निवडणूक आयोगाने राज्यातील दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.यामध्ये पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. दिवंगत मुक्ता टिळक यांच्यानंतर कसबा विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. यावर टिळक कुंटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया आली
केंद्रीय निवडणूक आयोगाने पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.