सध्या राजकारण सुरू वेळी निर्णय घेईल:संत्यजीत तांबे


सत्यजीत तांबे म्हणाले, ”गेले २२ वर्षं मी काँग्रेसमध्ये काम केलं. मी लहान असल्यापासून मला फक्त काँग्रेसच माहिती आहे. त्यामुळे माझ्या रक्तात, माझ्या श्वासात काँग्रेस आहे. काँग्रेस सोडून दुसरा विचार कधीच केला नाही. काँग्रेसशी एकनिष्ठ राहून आम्ही काम केलं. सत्ता माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही, त्यामुळे एकदा आमची बाजू समजून घ्यायला हवी होती”,
. सुधीर तांबे यांच्यापाठोपाठ युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई काँग्रेसकडून करण्यात आली. निलंबनाच्या कारवाईनंतर सत्यजीत तांबे नेमकी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. आज अखेर त्यांनी निलंबनावर प्रतिक्रिया देत मौन सोडले आहे
”२०३० साली आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या पणजोबा, आजोबांपासून चार पिढ्या आम्ही काँग्रेसमध्ये काम करत आलोत. त्यामुळे सत्ता येते, सत्ता जाते. सत्ता आल्यानंतची पदे आमच्यासाठी जास्त महत्त्वाची नाहीत. मी जन्मल्यापासून सत्ता पाहत आलो आहे. माझा जन्म ८३ सालचा. ८५ साली थोरात साहेब आमदार झाले होते. त्याआधीही माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हे देखील आमदार होते.
त्यामुळे आमच्यासाठी सत्ता हा मुद्दा जास्त महत्त्वाचा नाहीये”, असंही ते यावेळी म्हणालेतसेच डॉ. सुधीर तांबे यांच्यापाठोपाठ सत्यजीत तांबे यांच्यावरही काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना तांबे म्हणाले की, ”राजकारणात आपण काय काम करण्यासाठी आलो हे जास्त महत्त्वाचं असतं. आम्हाला निलंबित केल्याचे दु:ख आहे
. मात्र, योग्य वेळी मी याबाबत उत्तर देईल.अनेक शिक्षकांच्या संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे. या सर्व विषयावर मी योग्य वेळी निर्णय घेईल. सध्या राजकारण सुरू आहे राजकारण होऊ द्या. नंतर मी बोलेल”, अशी प्रतिक्रिया यांनी
डॉ. सुधीर तांबे यांना (Nashik) पदवीधर मतदारसंघातून(Congress) उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज भरला नाही. तर सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या विरोधात जाऊन अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, आता ते पुढे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.