राजा का बेटा, राजा नहीं बनेगा. राजा वही बनेगा, जो काबील होगा’ म्हणतं चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते नाना काटे,मैदानात


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – चिंचवडची निवडणूक जाहीर होताच येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर राजकीय वॉर सुरू झालं आहे. ‘राजा का बेटा, राजा नहीं बनेगा. राजा वही बनेगा, जो काबील होगा’ अशा आशयाची सूचक आणि बालकी पोष्ट सोशल मीडियावर काटे समर्थक व्हायरल करतांना दिसत आहे.
त्यामुळे काटे हे निवडणुकीत उभे राहणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.मी माझी तयारी करत आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असं चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील इच्छुक उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी म्हटले आहे.
आमचे कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना उर्फ विठ्ठल काटे हे 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या राहुल कलाटे यांना देखील लक्ष्मण जगताप यांनी पराभूत केले होते. परंतु, नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे
जगताप यांच्या भावकीतील माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची चिन्हे आहेत. ऐनवेळी निवडणुकीचा अर्ज भरून या निवडणुकीची रंगत वाढवण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. त्यामुळे नवनाथ जगताप यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाल्याने चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून
लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनाही तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शंकर जगताप यांना तिकीट मिळाल्यास चिंचवडमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी शड्डू ठोकला आहे. सर्व अंदाज बांधूनच काटे निवडणुकीच्या कामााल लागले आहेत
. त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले असून पोस्टरबाजी सुरू केली आहे.काटे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छाच बोलून दाखवल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आता भाजप आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे स्थानिक राजकारणात सर्वपक्षीयांशी चांगले संबंध होते.