२१ वी सदी की समस्याए और गांधी दर्शन’,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडून आयोजन*

गांधी पुण्यतिथीनिमित्त सामुदायिक प्रार्थना, व्याख्यान ,संवाद सत्र* ———— ‘२१ वी सदी की समस्याए और गांधी दर्शन’————*महाराष्ट्र गांधी स्मारक निधीकडून आयोजन*

पुणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे सामुदायिक प्रार्थना आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या राजकीय अभ्यास केंद्राचे डॉ. मणिंद्रनाथ ठाकूर यांच्या संवाद सत्राचे आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. ठाकूर यांच्याशी संवाद सत्राचा कार्यक्रम रविवारी , २९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.३० जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त सामुदायिक प्रार्थना गांधीभवन येथे सकाळी साडे आठ वाजता होणार आहे.

३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. ठाकूर यांचे ‘२१ वी सदी की समस्याए और गांधी दर्शन’ या विषयावरील व्याख्यान गांधीभवन (कोथरूड) येथे होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

हे सर्व कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे होतील.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड , आदित्य आरेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Latest News