बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या विरोधात जागृती साठी आयोजन .. गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र ‘ ची मुंबईत कार्यशाळा


सोन्याच्या दागिन्यांच्या विरोधात जागृती साठी आयोजन….. *’ गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र ‘ ची मुंबईत कार्यशाळा
*दादर :सोन्याच्या दागिन्यांचे अचूक व्हॅल्यूएशन कसे करावे, बनावट, कमी कॅरेटचे दागिने कसे ओळखायचे, बँकांशी करारनामे करताना बाळगावयाची सावधगिरी या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र या संस्थेने दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी कित्ते भंडारी सभागृह, गोखले रोड नॉर्थ, शिवसेना भवन जवळ(दादर पश्चिम), मुंबई येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत ही कार्यशाळा होईल.ही कार्यशाळा, सभासद असलेल्या ,नसलेल्या व्हॅल्युअर्स बांधवांना विनामूल्य आहे. व्हॅल्यूएशन करताना व्हॅल्युअर्सचा ‘कोड ऑफ कण्डक्ट’ कसा असावा, त्यांनी एका पाठोपाठ एक १० टेस्ट करून व्हॅल्यूएशन कसे करावे, ग्राहकाचे अवलोकन करून त्याची मानसिकता कशी जाणावी, करारनामा करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात इत्यादी बारीक सारीक गोष्टींची माहिती देण्यात येईल.
व्हॅल्यूएशन क्षेत्रात काम करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात याविषयी संस्थेचे ४० वर्षांपेक्षा अनुभव असलेले मान्यवर मार्गदर्शन करतील. ऑगमाँट एंटरप्राईज प्रा.लि. च्या रिसर्च हेड श्रीमती रेनिषा चैनानी या प्रमुख पाहुण्यां म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच कार्यशाळेला एम एस एम ई (MSME) चे संचालक प्रफुल उमरे, ‘ गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र ‘ चे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, अनिल वाघाडकर, डॉ. आनंद पेडणेकर, राजेंद्र दिंडोरकर, नचिकेत भुर्के, चेतन राजापुरकर, राजाभाऊ वाईकर तसेच दीपक देवरुखकर ह्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे
. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) आणि एम. सी. एक्स. (MCX) यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा होत आहे.’गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन, महाराष्ट्र’चे संघटक भैय्याभाऊ भामरे,प्रशासकीय सचिव सतीश पितळे, सह खजिनदार कालिदास कांदळगावकर कार्यकारिणी सदस्य संजय वाघ व समीर शहा हे कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.ही कार्यशाळा, सभासद असलेल्या , नसलेल्या व्हॅल्युअर्स बांधवांना विनामूल्य असून चहा,नाश्ता, दुपारचे जेवण व संध्याकाळचा चहाचा समावेश आहे.