गांधीनगरच्या सत्र न्यायालयाची आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा…..


गांधीनगर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – महिला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सरकारी वकिलांनी युक्तिवादात आरोपी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने सोमवारी आसारामविरुद्धचा खटला पूर्ण करत आसारामला आयपीसीच्या कलम ३७६, ३७७, ३४२, ३५४, ३५७ आणि ५०६ अंतर्गत दोषी ठरवले
सोमवारी न्यायालयाने आसारामला या प्रकरणात दोषी ठरवले होते. तर आसारामच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती.बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला ही शिक्षा सुनावली आहे
जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने आसाराम बापूला 23 हजारांचा दंड देखील ठोठावला आहे. तसेच पीडितेला 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
सन २०१३ मध्ये आसारामवर सूरतमधील एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तर या पीडितेच्या छोट्या बहिणीवर नारायण साई यानं बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामसह त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा हे आरोपी आहेत. यावेळी आसारामनं व्हर्चुअली कोर्टात हजेरी लावली. सुनावणीनंतर कोर्टानं आसारामला दोषी ठरवलं
आसाराम यापूर्वीच्या एका बलात्कार प्रकरणात सध्या जोधपुरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आसारामनं जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.पण कोर्टानं त्याची याचिका फेटाळून लावली होती
वयोमानामुळं वारंवार तब्येत बिघडत असल्याचं कारण त्यानं यासाठी दिलं होतं. पण त्याच्यावरील गंभीर गुन्हा पाहता कोर्टानं त्याला जामीन नाकारला. त्यानंतर आता सूरतमधील बलात्कार प्रकरणातही आसारामला शिक्षा सुनावली जाणार आहे, त्यामुळं आसारामच्या अडचणीत कमी होणार नाहीत.