विशाखापट्टणम,, आंध्रप्रदेश राज्याची राजधानी : मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ” मी तुम्हाला विशाखापट्टणम येथे आमंत्रित करण्यासाठी आलो आहे, जी आमची राजधानी असेल. मी पण विझागला शिफ्ट होईल. मी तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना आंध्र प्रदेशमध्ये व्यवसाय करणे किती सोपे आहे हे स्वतः पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे, “असे जगन मोहन रेड्डी म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विशाखापट्टणम ही राज्याची पुढील राजधानी असल्याची घोषणा केली आहे. हैदराबादला केवळ 10 वर्षांसाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची सामायिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आज मंगळवारी जाहीर केले की, विशाखापट्टणम ही राज्याची राजधानी असेल. आंध्र प्रदेशातून तेलंगण वेगळे झाल्यानंतर आंध्र प्रदेश तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधून आपले काम चालवत आहे.