हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत ग्वाही दिली आहेअवकाळी पावसाने फटका बसलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे राज्यातील पुणे, मुंबईसह अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक भागात ढ गाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेमुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली असून विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Latest News