PMPML ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही :आमदार रवींद्र धंगेकर


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुण्यात सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारून पुणेकरांना वेठीस धरले. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची भेट घेऊन केली.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असून त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य पुणेकरांनाही या संपामुळे अतोनात त्रास होत आहे. त्यामुळेच कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारणाऱ्या या ठेकेदारांवर त्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कडक कारवाई करावी. अशी मागणी करून रवींद्र धंगेकर यांनी केली
या ठेकेदारांच्या थकीत बिलांसंदर्भात संबंधितांशी तातडीने चर्चा करून प्रश्न मिटवावा. भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांनी अचानकपणे संप पुकारलेला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आहे. तसेच १० वी व १२ वी च्या परीक्षा चालू असून या संपाची झळ विद्यार्थांना मोठ्या प्रमाणात बसलेली आहे.
पी.एम.पी.एम.एल ला सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज या बाबत पी.एम.पी.एम.एल.चे व्यवस्थापक ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली
.”पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसचे संचलन पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व जवळपासच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात होत असते. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिकांची वाहतुकीची उत्तमरीत्या सोय होत असून, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस सेवेला पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जवळपासच्या ग्रामीण भागाची “जीवनवाहिनी” म्हणून संबोधले जाते
पर्यायाने परीक्षेला जाणे-येणेकरीता अडचणी निर्माण झालेल्या आहेत.परिवहन महामंडळाच्या भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांशी याबाबत तातडीने बैठक घेऊन बसेस कशा पध्दतीने पुर्ववत सुरू करता येतील, याकरीता निर्णय घेणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. भाडेतत्वावरील बसेसच्या ठेकेदारांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पुर्ववत सुरू करून पुणे व पिंपरी चिंचवड तसेच जवळपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशी नागरिक, विद्यार्थी, महिला पुरुष, ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी,असे निर्देश या बैठकीत दिले
. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्यशासन यांच्याशी यासंदर्भात तातडीने चर्चा करून हा प्रश्न मिटविण्याचे प्रयत्न करत असल्याचे यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी सांगितले.यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी त्यांच्यासोबत होते