कसब्यात 28 वर्षे भाजपचा आमदार निवडून येता,तिथे भाजपचा पराभव झाला- अजित पवार


“ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कसब्याची निवडणूक तर त्यांना अशी झोंबली. ते म्हणतात, ती निवडणूक हरली तरी आम्ही जोमाने जावू. तुम्ही जोमाने जाणार मग आम्ही बिन-जोमाने जाणार आहोत का? यांच्यातच जोम आहे का? आमच्यात जोम नाही? आम्ही तर आणखी डबल जोमाने जावू. कसब्यात २८ वर्षे भाजपचा आमदार निवडून येत होता. तिथे भाजपचा पराभव झाला,” असेही अजित पवारांनी सुनावले
महाविकास आघाडी एकसंध ठेवून आपण गेलो तर, निश्चितच आपल्याला यश मिळेल. गावपातळीवरही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीत एकोपा ठेवला पाहिजे. कसबा आणि चिंचवडला पण टफ फाईट झाली. चिंचवडला आपले दोघे उभे राहिले. काटे आणि कलाटे दोघे उभे राहिले. दोघांनीही उमेदवारी मागितली होती. दोघांनी घेतलेली मते विचारात घेतली तर भाजपपेक्षा जास्त आहेत. पण, तिथे सगळ्यांची सांगड घालायला कमी पडलो
. पण इथून पुढे आपण एकत्र लढले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.”आताच्या काळात शिक्षकांना आणि पदवीधरांनी बदल कलेला महाराष्ट्राने पाहिला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारयांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कसबा आणि चिंचवड नसभापोटनिवडणुकीवरून अजित पवारांनी भाजपला लक्ष्य केले.
तसेच, महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे आपण येणाऱ्या निवडणुकींना सामोरे गेलो तर आगामी काळात आपला विजय निश्चित आहे,असेही पवार म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे एका सभेतून अजित पवार म्हणालेअजित पवार म्हणाले,
“शिंदे-फडणवीस सरकार आलं आणि आमच्या काळात घेतलेल्या विकास कामांच्या निर्णयांना स्थगिती देवून टाकली. का बरं? तिथे माणसं राहत नाही का? ती कामे करा. तुम्हीही नवीन कामे करा. काय होतंय जास्त कामं झाली म्हणून, हा कशाला रडीचा डाव. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलं नाही. जनतेच्या मनाते येईल तेव्हा जनता बदल करते,” असा इशारा त्यांनी दिला.