माझा बदला हा आहे की, मी या सर्वांना माफ केले: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – मी बदला घेणार आणि माझा बदला हा आहे की, मी या सर्वांना माफ केले. आम्ही पहिलेच आमच्या विरोधकांना माफ केलेले आहे, त्यामुळे आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या दिवशी स्पष्ट केले

होळीच्या दिवशी मला फक्त एक दोन लोकांनाच सल्ला द्यायचा आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही ती तशी आहे. पण काही लोकं ३६५ दिवस शिमगा करतात. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की एकदा-दुसरा दिवस ठीक आहे. उरलेले ३६४ दिवस आपण सभ्य माणसासारखं वागण्याचा प्रयत्न केला, तर उत्तम होईल

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना होळीच्या शुभेच्छा. होळी आणि रंगपंचमी हे अशा प्रकारचं पर्व आहे. ज्यावेळी आपण होलिका देवीच्या ज्वालारमध्ये जे जे वाईट आहे, ते टाकून जाळून देतो. दुसरीकडे रंगोत्सवाच्या निमित्ताने एकमेकांना एकमेकांच्या रंगातून रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसे होळीचे रंग आहेत

, तसेच आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला बघायला मिळतील. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपल्याला पहायला मिळेल. विधानसभेत मी सांगितलं होतं की, अनेक लोकांनी मला त्रास दिला आहे

आमच्या मित्रांना होळीच्या वेळी कोणीतरी खोट सांगून भांग पाजली हेाती. त्यानंतर दिवसभर कोणी गाणं म्हणत होतं, तर कोणी रडत होतं. ते सर्व पाहून मजा आली. पण, मी सांगण्याचा प्रयत्न केला की, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा आणि कामाचा नशा करावा, असेही देवेंद्र फडणवीसअवकाळी पाऊस हा चिंतेचा विषय आहे. तो कमी भागात झाला असला तरी त्यामुळे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे राहील, असा दिलासाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला

Latest News