महाविकास आघाडी सरकार च्या योजना, त्याच घोषणा नाव बदलून जाहीर केल्या -उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली.’आम्ही ज्या योजना घोषणा केल्या. त्याच बदलून जाहीर केल्या आहेत. मुंबई बाळासाहेब दवाखाना ही आमची योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. सर्व घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

तसेच हा अर्थसंकल्पाबद्दल एका वाक्यात सांगायंचं झालं तर हा अर्थसंकल्प केवळ गाजरचा हलवा आहे, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या.

मात्र, विरोधकांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडलं. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला. शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा,असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.