कॉमेडी अभिनेता सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड…


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ) अभिनयातून प्रेक्षकांच्या मनाच्या भिंतीवर एखाद्या फ्रेमसारखेच कोरून ठेवणारे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज, गुरुवारी निधन झाले
सतीश कौशिक यांच्या निधनाच्या वृत्तानं अवघं बॉलिवूड विश्व शोकसागरात बुडालं. कौशिक यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.
त्यांनी कौशिक यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता : ८० च्या दशकात ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील ‘कॅलेंडर’चं पात्र दमदार
. शवविच्छेदनानंतर कौशिक यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे.शवविच्छेदन प्रक्रियेनंतर सतीश कौशिक यांचे पार्थिव शरीर मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. आज संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास वर्सोवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूआधी आदल्या रात्री नेमके काय झाले, याची माहिती त्यांच्या मॅनेजरनं दिली. बुधवारी रात्री साधारण ९.४० वाजता सतीश कौशिक हे झोपण्यासाठी निघून गेले. त्यानंतर साधारण १० वाजता मला फोन आला. मला अस्वस्थ वाटतंय, असं त्यांनी फोनवरून सांगितलं. मी पूर्णवेळ त्यांच्यासोबतच होतो. असं काय होईल असं वाटलं नव्हतं, असंही मॅनेजरनं सांगितलं.यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, कौशिक यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक अहवालानुसार कौशिक यांच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नाहीत