१५ मार्च रोजी ऑटोमोटिव्ह ग्राहकांसाठी प्रदर्शन आणि गुणवत्ता प्रणालीविषयी मार्गदर्शन सत्र


१५ मार्च रोजी ऑटोमोटिव्ह ग्राहकांसाठी प्रदर्शन आणि गुणवत्ता प्रणालीविषयी मार्गदर्शन सत्र
ग्राहक दिनी ‘मकास ऑटोमोटिव्ह’ चा मेळावा
पुणे :
आंतररराष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून १५ मार्च रोजी ‘मकास ऑटोमोटिव्ह’ ने पुण्यात रेसिडेन्सी क्लब येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. ग्राहक,मेकॅनिक,रिटेलर यांना कंपनीचे नवे तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख धोरणाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. या निमित्ताने विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून गुणवत्ता प्रणालीविषयी मार्गदर्शन सत्र होणार आहे. सकाळी ११ वाजता मेकॅनिक मेळावा आणि सायंकाळी ६ वाजता रिटेलर,ग्राहक मेळावा होणार आहे.
‘मकास ऑटोमोटिव्ह’ चे व्यवस्थापकीय संचालक अनुज मेहता,सरव्यवस्थापक प्रमोद कुमार,विभागीय व्यवस्थापक एस.एन.यादव,मार्केटिंग मॅनेजर असिफ खान,विभागीय व्यवस्थापक प्रदीप मौर्य,अभिजित ऑटो कंपोनंटस प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र कुमार सिंग,मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कुमार सिंग,विकास अधिकारी संतोष कुमार सिंग,गोयल एजन्सी(पुणे) चे प्रमुख सुनील गोयल उपस्थित राहणार आहेत.पुण्याच्या अवजड वाहन उद्योगांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.
संतुष्ट ग्राहक हेच धोरण
फरिदाबाद मध्ये २००३ मध्ये स्थापन झालेली ‘मकास ऑटोमोटिव्ह’ ही कंपनी क्लच,ब्रेक आणि फ्रिक्शन मटेरियल ची निर्मिती करते.देश-विदेशात ही उत्पादने वापरली जातात. ‘ग्राहक हे दैवत’ असे कंपनीचे धोरण आहे.
त्यामुळे कंपनीने प्रत्येक उत्पादनाच्या पॅकेट वर ग्राहकांच्या संपर्कासाठी कस्टमर केअर नंबरसोबत सरव्यवस्थापकांचा नंबरही दिला आहे. ग्राहकाची प्रत्येक अडचण सोडवली जाते आणि शंका समाधान केले जाते. … प्रगतीसाठी सर्व दिशा अपुऱ्याच असतात पण या क्षेत्रातील सर्व बाजारपेठ काबीज करून ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचे उद्दिष्ट कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे.