NIA च्या पथकाने पुणे,मध्यप्रदेशातील सिवोनी जिल्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात…

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – एनआयएच्या पथकाने पुणे तसेच मध्यप्रदेशातील सिवोनी जिल्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एनआयएच्या पथकाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे

पुण्यात तलहा खान आणि मध्यप्रदेशातील सिवोनी गावातील अक्रम खान यांच्या घरी एनआयएच्या पथकाने छापे टाकले. दिल्लीतून काश्मिरी दांपत्य जहाँजेब वाणी आणि त्याची पत्नी बशीर बेग यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) अटक केली होती

वाणी दांपत्य इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या दहशतवादी गटाशी संबंधित असल्याची माहिती तपासात मिळाली होती. तसेच या प्रकरणात तिहार कारागृहात असलेला आरोपी अब्दुल बशीथ संशयित असल्याची माहिती मिळाली

. त्यानंतर मध्यप्रदेशातील सिवोनी येथे छापे टाकण्यात आले होते. तेथे अब्दुल अजीज सलाफी आणि शोएब खान यांची चौकशी करण्यात आली. दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतशी (आयएसकेपी) संबंधित चार ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापे टाकले.

अफगाणिस्थानात रचलेल्या कट प्रकरणात आरोपी महम्मद शरीक, माझ मुनीर खान, यासीन आणि अन्य आरोपी परदेशातील सूत्रधारांच्या सूचनेनुसार देशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते. त्यांना आभासी चलनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता

आरोपी महम्मद सरीकने स्फोट घडवून आणण्याचा कट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आखला होता. मात्र, वाटेत बाँबचा स्फोट झाला झाला होता. मध्य प्रदेश, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी दहशतवादी गटांकडून प्रयत्न सुरू होते

. त्या अनुषंगाने ही कारवार्इ करण्यात आली आहे मध्यप्रदेशातील सिवोनी जिल्ह्यातील तरुणांना एकत्र आणून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया करून घेतल्या जाणार होत्या. एनआयएच्या पथकाने शोधमोहिम राबवून काही साहित्य जप्त केले

. अफगाणिस्तानसह देशात सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी गटांचे काम सोशलमीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले जात आहे. त्यामाध्यमातून तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेतले जात असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार ही कारवार्इ करण्यात आली.

Latest News