पुण्यातील धायरी परिसरात भीषण आग, आठ सिलिंडरचा स्फोट

पुण्यातील धायरी परिसरात भीषण आग, सिलिंडर स्फोट झाल्याचीही माहितीफायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे.

पुणे : पुण्यातील धायरी परिसरात पेंट कंपनीला भीषण आग लागली होती. गल्ली नंबर २२ मध्ये ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाला होता. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवलं आहे

रंगाच्या कंपनीला ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीमुळे पाठोपाठ ७ ते ८ सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट झाल्याचीही माहिती समोर येत आहे. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून आकाशात धुराचे लोट पसरले होते.

Latest News