दहावीचा गणित पेपर महिला सुरक्षा गार्ड च्या मोबाईल मध्ये, पुण्यात गुन्हा दाखल


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) दहावीची परीक्षेबाबत पुण्यातून मोठी माहिती समोर येत आहे. दहावीचा गणित भाग एकचा पेपर हा एका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.मनिषा कांबळे असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला.याप्रकरणी या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
– 13 मार्चला गणित भाग 1 हा पेपर होता. यावेळी सुरक्षा रक्षक मनिषा कांबळेने परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
15 मार्चला (काल) बोर्डाचं पथक तपासणीसाठी विद्यालयात गेलं असता आरोपी महिलेवर पथकाला संशय आला. यानंतर तिच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली, ज्यामधून गणित भाग एक प्रश्नपत्रिकेचे फोटो तिनं काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली मात्र उडवाउडविची उत्तर देण्यात आली. पथकाकडूनबिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे