पिंपरी महापालिकेन निवासी बांधकामाना 40% सवलत द्यावी :मारुती भापकर

पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील पुणे महापालिकेच्या या योजनेच्या धर्तीवर शहरातील निवासी बांधकामांना ४० टक्के मिळकत करात सवलत देण्याची योजना राबवावी. तसेच मिळकतकरांसाठीची अभय योजना बंद असून ती पुन्हा सुरू करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे

पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने निवासी बांधकामांना मिळकत करात ४० टक्के सवलत योजना राबवने व मिळकतकरांसाठीची अभय योजना पुन्हा सुरू करावी अशा आशयचे निवेदन त्यांनी आयुक्ताना दिले आहे

पुणे महापालिका क्षेत्रात स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळत होती. मात्र सन २०१८ मध्ये ही सवलत रद्द करण्यात आली. याचा फटका ९७ हजार ५०० मिळतधारकांना बसला. पुणे महापालिका हद्दीत १ एप्रिल २०१९ पासून नव्याने समाविष्ट झालेल्या मिळकत धारकांना ४०टक्के कर सवलत १ लाख ६७ हजार मिळकत धारकांना मिळाली नाही. त्यानंतर ५ लाख मिळकत धारकांची ही सवलत काढण्याचे काम सुरू होते.

आता मिळकत करात ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा फायदा पुण्यातील साडेसात लाख मिळकत धारकांना मिळणार आहे. या पुणे महानगरपालिकेच्या योजनेमुळे मिळकत धारकांचे सुमारे २०० कोटी रुपये माफ होणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवासी बांधकामांना मिळकत करात ४० टक्के सवलत देण्याची ही योजना स्वागत आहे

पिंपरी-चिंचवडकर त्रस्त असून याचा सारासार विचार करून या दोन्ही मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पिंपरी चिंचवड करदात्या नागरिकांना बरोबर घेऊन जन आंदोलन उभारावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला आहे .

Latest News