महिलांना अर्ध्या तिकीटाची सवलत देण्यापेक्षा अकराशे रुपयांचा गॅस सिलेंडर चारशे रुपयांत द्या- सुषमा अंधारे


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) महिलांना अर्ध्या तिकीटाची सवलत देण्यापेक्षा अकराशे रुपयांचा गॅस सिलेंडर चारशे रुपयांत द्या, असा टोला सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले
निलंगा येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी पंचायत समिती येथे सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देत भेट दिली.उपस्थित कर्माचाऱ्यांशी संवाद देखील साधला. सध्याचे सरकार केवळ विविध विषयामध्ये अभ्यास करण्यात मग्न आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एखाद्या प्रकरणाचा किती अभ्यास करता हे समजत नाही. जर परिक्षेलाच बसला नाहीत, तर मग अभ्यास कशाला करता, असा टोला देखील अंधारे यांनी यावेळी लगावला
राज्यातील खासदार व आमदार या लोकप्रतिनीधींनी काय जगावेगळं काम केलंय, त्यांना लाखोच्या घरात पेन्शन आहे. ते स्वतः पेन्शन घेतात मग आम्हाला का देत नाहीत? पेन्शनमुळे असा कोणता अतिरिक्त भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे हे तरी कळू द्या.
तो आम्ही सोडवू असे सांगून कोणत्याही निधीबाबत किती खर्च झाला तो कसा वापरला याचे परिक्षण कॅग करत असते, असा चिमटा त्यांनी काढलाया सरकारने केवळ जाहीरातीवर कोट्यावधी रूपयाची उधळण केली असून मुख्यमंत्री तर विमान थांबवून बोलतात, विमान कसं थांबतय कळत नाही. तेथे रेंज कशी येते? असे विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.
शिवाय एकाच वर्षात जाहीरातीवर ४२० कोटी खर्च केला, हा केवळ स्वतःच्या आर्त्या ओवाळण्यासाठी केलात. मग कर्मचाऱ्यांचे प्रश्न का सोडवत नाही. कर्मचाऱ्यांसाठी प्रसंगी शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे स्त्यावरच्या आंदोलनासाठी देखील तयार असल्याचे अंधारे म्हणाल्या.
सध्याचे राज्यातील सरकार हे देणारे सरकार असेल तर सात दिवसांपासून जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू का करत नाही? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
.