राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा, tweet: सत्य माझा ईश्वर आहे. अहिंसा हे यासाठीचं प्राप्त करण्याचं साधन,

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधी यांनी पहिले ट्वीट केले आहे. राहुल गांधी ट्वीट केली आहे. माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा ईश्वर आहे. अहिंसा हे यासाठीचं प्राप्त करण्याचं साधन, असे राहुल गांधी म्हणालेसुनावली आली आहे. यानंतर त्यांना जामीन ही मंजूर करण्यात आला, मात्र यामुळे आता राहुल गांधीची खासदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. यानंतर त्यांना निवडणुका लढवण्यास बंदी येणार का? अशी ही चर्चा होत आहे.

‘मोदी’ आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल होता. सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना एका फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. यानंतर त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला. निकालाच्या वेळी खुद्द राहुल गांधीही कोर्टात हजर होते. 2 वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्वही धोक्यात आले आहे17 मार्च रोजी सुनावणी संपल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांनी आदेश राखून ठेवला होता. 2019 मध्ये राहुल गांधींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्नाटकातील एका निवडणूक सभेत त्यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावेळी राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राहुल म्हणाले होते, ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी हेच का?’ यानंतर भाजप आमदार परनेश मोदी यांनी राहुल गांधीविरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्यामुळे मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना तीन वेळा न्यायालयात हजर राहावे लागले. त्यांनी निवडणुकीच्या सभेत विधान केल्याचे सांगितले होते. या भेटीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करण्यात आले होते.

Latest News