कथकली नृत्याच्या माध्यमातून उलगडली क्लिओपात्राची प्रेम कहाणी !-‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’ आयोजन

–*कथकली नृत्याच्या माध्यमातून उलगडली क्लिओपात्राची प्रेम कहाणी !*———–‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘क्लिओपात्रा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शनीवार , २५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.

क्लिओपात्राच्या प्रेमकहाणी वरील सादरीकरण या कार्यक्रमात कथकली च्या माध्यमातून करण्यात आले. संकल्पना प्रबल गुप्ता (बंगळुरू)यांची होती, संगीत सदनम सिवदास यांचे होते.

या सादरीकरणासाठी सदनम शिवदासन,सदनम ज्योतिष बाबू यांनी आवाज दिला होता. संस्कृत भाषेतील हे सादरीकरण इंग्रजीतदेखील भाषांतरित करून सांगण्यात आले. जगातील सुंदर स्त्री मानली गेलेल्या क्लिओपात्राच्या आयुष्यातील प्रेम, संघर्ष, वादळांची कहाणी प्रबल गुप्ता यांनी कथकली नृत्य आणि प्रभावी अशा मुद्राभिनयातून सादर केली.

रसिकांनी या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५६ वा कार्यक्रम होता

Latest News