आमचा लढा, आंदोलन लोकशाही टिकवण्यासाठी- विश्वजीत कदम माजी मंत्री

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -संसदेत, विधानसभेत विरोधकांचा आवाज दडपला जातो. हा लोकशाहीला कलंक आहे. आम्ही सुरू केलेला हा लढा, आंदोलन लोकशाही टिकवण्यासाठी आहे, अशा शब्दात माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी आंदोलना बाबत भूमिका मांडली गुंडा गर्दी नही चलेगी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भामाबाई धोंडीबा आदमाने या ज्येष्ठ महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या.

संसदेत प्रश्न विचारणे गुन्हा? देश लुटणारांना चोर म्हणणे गुन्हा? अदानी बाबत चौकशी करण्यास सांगणे गुन्हा? असे प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले

कोथरूड ब्लॉक काॅग्रेस कमिटीने महर्षी कर्वे पुतळा चौक येथे निषेध आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी कदम यांनी विचार मांडले.

.संयोजन माजी नगरसेवक रामचंद्र कदम यांनी केली. माजी मंत्री विश्वजीत कदम, रमेश बागवे, शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार दिप्ती चौधरी, मोहन जोशी, अभय छाजेड, दत्ता बहिरट, विजय खळदकरकिशोर मारणे, मारोती माने, शिवाजी भोईटे, पांडुरंग गायकवाड, नयना सोनार, यशराज पारखी, अशोक शेलार, उमेश ठाकूर, सोनाली मारणे, आण्णा गोसावी, तात्या कसबे, सोमनाथ पवार, रविंद्र माझीरे, मनिषा करपे, गणेश मारणे, संजय मानकर, युवराज मेदगे, राजाभाऊ साठे आदी उपस्थित होते.

Latest News