भाजपा चे पुण्याचे खा गिरीष बापट यांचे निधन

पुणे – भाजप नेते खासदार गिरीष बापट यांचे आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांना दिली. गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत

गिरीश बापट आजारी असल्यामुळे त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. परंतु बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज सायंकाळी सात वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली

आजारी असूनही पक्षासाठी उतरले होते

प्रचारात

भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यावेळी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. यावेळी प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांनी रासनेंसाठी प्रचार केला होता. त्यावेळी देखील ते उपचार घेत होते.