वडमुखवाडी येथील श्री साईबाबा मंदिरातश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा


वडमुखवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात
श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
पिंपरी पुणे (दि. ३० मार्च २०२३) – वडमुखवाडी, भोसरी येथील श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे यांच्या हस्ते श्रीराम व साईबाबांची आरती करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी श्रीराम जन्मा निमित्त बबिता नेलगे, अपर्णा नेलगे, अमृता नेलगे आदी महिलांनी पाळणा गायला.