एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवास चांगला प्रतिसाद-*भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन


*एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवास चांगला प्रतिसाद* —————–*भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन*
पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ( आयएमईडी) तर्फे आयोजित ‘एक्स्प्रेक्शन्स २०२३ ‘ या वार्षिक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महामेट्रो रेल कार्पोरेशन(पुणे )चे उप सरव्यवस्थापक मनोज डॅनियल यांच्या उपस्थितीत झाले
. भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते. २७ ते २९ मार्च दरम्यान हा महोत्सव उत्साहात झाला.
या उपक्रमाचे हे १० वे वर्ष होते.’जांबोरी’ या गोव्यातील कार्निव्हल च्या धर्तीवर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता . या महोत्सवात विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, खेळ, दागिने, खेळ, छायाचित्रांचे स्टॉल लावले होते.
या महोत्सवाबरोबरच ‘ लॉंचपॅड ‘ उपक्रमात २० गट सहभागी झाले. विविध स्टार्ट अप, उद्योग संकल्पना, सेवा संकल्पना यांना वाव देण्यात आला
. उद्योजकता मार्गदर्शन उपक्रमात विद्यार्थ्यांनी चहावाला, लाँड्री, दुचाकी दुरुस्ती व्यावसायिक, अशांना उद्योजकता कौशल्ये शिकवली.’ विद्यार्थ्यांची उद्योजकता वाढीस लागण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील ‘ असे उद्गार मनोज डॅनियल यांनी काढले. महोत्सवाचे मुख्य समन्वयक डॉ. प्रवीण माने यांनीही मनोगत व्यक्त केले.