चांगला परतावा देण्याच्या आमिषाला बळी,सायबर चोरट्यांनी मारला एक कोटी दहा लाखाला गंडा….

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) -लष्करातून निवृत्त झालेल्या सुभेदाराला सायबर चोरट्यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा गंडा घातला.सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हिडिओला लार्इक्स मिळवून देण्याच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून निवृत्त सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले आहेत.तुम्हाला दिलेले उद्दिष्ट साध्य केल्यानंतर बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी सांगितले.
सुभेदाराने चोरट्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने ऑनलाइन पद्धतीने एक कोटी दहा लाख रुपये जमा केले. त्यासाठी त्यांनी नातेवाईकांकडून देखील काही रक्कम घेतली होती. मात्र चोरट्यांनी कोणताही परतावा देण्यात आला नाही.
फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.सायबर पोलिस ठाण्यात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी पाच बँकेतील १२ खात्यात पैसे जमा करून घेतले असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी निवृत्त सुभेदारास संदेश मेसेज पाठवत सोशल मीडियावरील जाहिराती आणि व्हिडिओला लार्इक्स मिळवून दिल्यास त्यात मोठा नफा मिळेल, अशी माहिती दिली
.या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दहा ते वीस टक्के नफा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखवले. त्यानुसार सुरवातीला चोरट्यांनी तक्रारदार सुभेदारास काही पैसे देखील दिले. त्यामुळे तक्रारदार सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडले व त्यांनी गुतंवणूक करण्याची तयारी दर्शवली.