पुणे लोकसभा पोटनिवडणूक साठी स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा ही लोकसभेची निवडणूक त्यामुळे होणार आहे. बापट यांच्या स्नुषा (सुनबाई) स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा.. भाजपा मध्ये सुरु झाली आहे

.मतदारसंघ रिक्त झाला आहे. गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्याआधी दोन महिन्यापूर्वीच पुण्याचा कसबा विधआनसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचेही निधन झाले.

जगताप यांच्या निधनानंतर अवघ्या तीन आठवड्यात पुण्याची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यामुळे आताही लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे

दरम्यान, या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होणार का, भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागलं आहे. जर लोकसभेची पोटनिवडणूक लागलीच तर भाजपकडून पाच नावांची चर्चा आहे.यात गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट,भाजप नेते संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत असल्याची माहिती आहे.

तर काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन दोन दिवस उलटत नाहीत तर पुण्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे.एवढचं नाही तर पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे ‘भावी खासदार’ अशा आशयाचे बॅनरही शहरात लागले आहेत.

या बॅनरबाजीमुळे टीकेची झोड उठली.या टीकेनंतर हे बॅनर अखेर हटवण्यात आलेगिरीष बापट यांच्या लोकसभेचा कार्यकाळ संपण्यास अजून एक वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ही लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे बापट यांच्या स्नुषा (सुनबाई) स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा आहे

. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्याच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या कुटूंबियाना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यानंतर कसबा पोटनिवडणुकीचा जो निकाल लागला तो संपूर्ण राज्याने पाहिला पुण्यात बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजप बापट यांच्या कुटूंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे

. लोकसभेसाठी बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा असली तरी त्या पुण्याच्या राजकारणात नवख्या आहेत. त्यामुळे आधीपासून पुण्याचा राजकारणाची माहिती असलेल्या नावांची चर्चा आहे. यात मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक, संजय काकडे, मेधा कुलकर्णी यांचाही विचार केला जाऊ शकतो. दरम्यान, कसब्यात भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे ब्राह्मण मतदारांची नाराजी ओढावून घेतली होती. पण आता स्वरदा बापट यांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय झाला तर मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

Latest News