खासदार संजय राऊत यांना धमकी मुंबई पोलिसांनी पुण्यातून एकाला केली अटक..

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) खासदार संजय राऊत यांना काल धमकी मिळाल्यानंतर आज त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पोलिसांना याप्रकरणी एका आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.

या तक्रारीवरून 504 (506 )2 गुन्हा नोंद करण्यात आला आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दुसऱ्यांदा धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली

. मात्र यावेळी धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आल्याने चिंता वाढली होती. आमदार सुनील राऊत यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी वेगाने हालचाल सुरु कत तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुण्यातून एकाला ताब्यात घेतलं आहे.

राहुल तळेकर या 23 वर्षीय तरुणाला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. राहुल मुळचा जालनाचा रहिवासी आहे. काल तो संजय राउत यांना फोन करत होता. मात्र फोन संजय राऊतांनी त्याचा फोन उचलला नाही. त्यानंतर राहुलने दारूच्या नशेत त्यांना धमकीचा मेसेज केला होता

-मुंबई पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांनी याबबात पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.

राहुल हा पुण्यात एक हॉटेल चालवतो. त्याचा कोणताही पॉलिटिकल किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंड समोर आलेला नाही. राहुलचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी काहीही संबंध असल्याचं प्राथमिक तपासात तरी दिसत नाही. तपासात जे निष्पन्न होईल त्यावर पुढील कारवाई केली जाईल, असं उपायुक्त कराड यांनी म्हटलं.

Latest News