गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस झेपत नसेल तर राजीनामा द्यावा- खासदार सुप्रिया सुळे

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – गृहमंत्रालयाचे प्रचंड अपयशी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजे माळवाडी परिसरात पत्रकारांशी बोलताना केली आहे.

वारजे माळवाडीतील प्रभाग ३२ मधील विविध सोसायट्यांमध्ये त्यांचा दौरा आयोजित केला होता. त्यादरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत जीवे मारण्याची धमकीची दुसऱ्यांदा घटना घडली आहे

आता त्यांना एके ४७ ने मारण्याची धमकी आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. खासदार संजय राऊत यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा माझी सरकारकडे आग्रहाची विनम्र विनंती राहील.

लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत. राज्यात विविध दंगलीच्या घटना घडत आहेत. पुण्यामध्ये कोयता गॅंग या आधी कधी नव्हती. त्याबाबत गृहमंत्र्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. याचा अर्थ गृह खात्याचा वचक, दरारा नाही काय ? असा प्रश्न खासदार सुळे यांनी व्यक्त केला आहे.

गृहमंत्रालयाचे काल पुन्हा एकदा अपयश दिसून आले. महाराष्ट्रात दंगल झालेली आहे. खूप गोष्टी अतिशय गंभीर होत आहेत. का व्यक्तीने फोन करुन खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे.राजकारण सध्या गलिच्छ पद्धतीने सुरू आहे. आम्ही सर्वांनी मिळून त्यावर एकाच एकमत केले पाहिजे. असे सांगून सुळे म्हणाल्या, राज्यात अनेक ठिकाणी तणाव आहे. त्यामुळे त्याबाबत मी आता काही बोलणार नाही.

राज्यात शांतता होत नाही. तो पर्यंत तरी लोकप्रतिनिधी म्हणून मी जबाबदारीनेच बोलले पाहिजे. तसेच खासदार राऊत यांना धमकी देणार्‍यांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. विरोधात बोलत असेल तर त्याचा तुम्ही खुन करणार का, नक्की काय चाललंय, ग्रह मंत्रालयाने याची सविस्तर चौकशी केली पाहिजे.

.

Latest News