दहा दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात…  जितेंद्र आव्हाड 

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ) भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा,

बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत..तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार..” दहा दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बॅनर का तुम्ही वाटच बघत होतात…अशा शब्दात आव्हाडांनी संपात व्यक्त केला आहे

आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत..हाच का तुमचा वेगळे पणा..

. त्यांनी असे बॅनर लावणाऱ्यांचा चांगलेच सुनावलं आहे पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले आहे. बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे.

अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.बापटांच्या निधनानंतर अवघ्या तीनच दिवसात पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज (१ एप्रिल) वाढदिवस, यानिमित्ताने मुळीक यांना शुभेच्छा देणारे फलक त्यांच्या समर्थकांची विविध ठिकाणी लावले आहेत,

यात आणखी भर म्हणून अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जगदीश मुळीक यांचा ‘भावी खासदार’ असा उल्लेख करीत त्यांचे बॅनर लावले होतेया बॅनरवर झळकल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचेप्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजपची लाज काढत बॅनर टि्वट केले आहेत. चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे.

Latest News