अंबरनाथ चे आमदार बालाजी किणीकर यांची महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – हौसिंग सोसायटीच्या आवारात असलेले बुद्धविहार पाडण्याचा डाव मिंधे गटाचे अंबरनाथमधील आमदार बालाजी किणीकर यांनी आखला आहे. मात्र याचा जाब विचारणाऱ्या महिलांनाच किणीकर यांनी अर्वाच्य भाषेत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

माझ्या नादी लागू नका नाहीतर एकेकीला आधारवाडी जेलमध्ये टाकीन, अशी दर्पोक्तीच केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे

अंबरनाथच्या वडवलीमध्ये राहुल हौसिंग सोसायटीच्या जागेवर असलेले मैत्रेय बुद्धविहार पाडून ती जागा विकासकामाच्या घशात घालण्यात येणार असल्याची माहिती मैत्रेय बुद्धविहारच्या महिला कार्यकर्त्यांना मिळाली होती.

माहिती घेण्यासाठी महिला पदाधिकारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी बुद्धविहार पाडण्यास विरोध आहे, असे शांतपणे सांगितले. यावर संतप्त झालेल्या बालाजी किणीकर यांनी ‘मी पहिल्यासारखा राहिलो नाही’ एकेकीला आधारवाडी जेलमध्ये टाकेन, माझ्या नादी लागू नका, अशी धमकीच दिल्याचा आरोप या महिलांनी केला आहे

Latest News