राष्ट्रवादी चे प्रवीण गोपाळे सरपंचाच्या हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात


पुणे: राष्ट्रवादी सरपंचाच्या हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात
पुण्याच्या मावळमध्ये शिरगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने चार संशयित या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे अधिक चौकशी पोलीस करत आहेत.
प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी पक्षाचे असून काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत गोपाळे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली होती.
पुण्याच्या मावळमध्ये शिरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास अज्ञात तीन व्यक्तींनी कोयत्याने सपासप वार करून हत्या केली. या घटनेमुळे मावळ परिसरात खळबळ माजली आहे.
गोपाळे हे शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर दुचाकीवर बसले असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर पाळत ठेवून अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रवीण गोपाळे हे गंभीर जखमी झाले होते. ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. तेव्हा त्यांना काही अंतरावर गाठून त्यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारले गेले.
गोपाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मावळ परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी रवींद्र साहेबराव गोपाळे मावळ तालुक्यातील(रा. शिरगाव, मावळ पुणे) यांनी शिरगाव- परंदरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, चार संशयीतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. महेश भेगडे (रा. तळेगाव), अशोक कांबळे (रा. पोस्ट नाणे), मनीष ओव्हाळ (रा. जांभुळगाव), अमोल गोपाळे (रा. सोमाटणे फाटा) असे गुन्हा दाखल करण्यात करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत