डॉ आंबेडकर जयंती निमित्ताने बहुजन समाज पक्षा च्या वतीने महाराष्ट्रात ‘ ‘गाव ‘चलो अभियान


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- यंदाच्या बाबासाहेबांच्या जयंती दिनाचे औचीत्य साधुन बहुजन समाज पक्षाने संपुर्ण राज्यातील 36 जिल्हयात गाव चलो अभियान प्रारंभ करणार आहे. खेडया पाडयातील शोषीत पीडीत उपेक्षीत समाजा पर्यंत एकाच वेळी डॉ. बाबासाहेबांचा विचार पोहचण्याचा हा प्रयत्न असेल
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बौध्दीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती यावर्षी 2023 रोजी देशात विदेशात मोठया जल्लोषात साजरी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात समता प्रस्थापित व्हावी म्हणुन दिवस रात्र एक केला. त्यांनी लावलेल्या वृक्षाचे आता वट वृक्षात रुपांतर झाले आहे.
समाजातील सर्व घटक त्याचा उपभोग घेतांना दिसत आहे. केंद्रातील राज्यातील सत्ताधारी पक्षाने समाजातील शेवटच्या घटकाला त्रास देण्याचे काम सुरु केले आहे. यापुर्वी काँग्रेसही अशाच प्रकारे काम करीत होती.
सत्ताधाऱ्यांचे मनसुबे बहुजन समाज पक्ष ओळखुन आहे. म्हणुनच . जयंती महोत्सवाच्या निमीत्ताने बहुजन समाज पक्षाचे राज्यभर गाव चलो संपर्क अभियान येत्या 3 एप्रील 2023 ते 30 एप्रील 2023 पर्यंत राज्यातील प्रत्येक विधानसभेत म्हणजे 288 विधानसभा क्षेत्रात, 48 लोकसभा क्षेत्रात प्रत्येकी 132 बूथ गठीत करणे म्हणजे 3016 बूथ तयार करण्याचा बहुजन समाज पक्षाने संकल्प निर्धार केला असुन या दरम्यान 3 एप्रील 2023 ते 30 एप्रील पर्यंत संपुर्ण राज्यात एकाच वेळी गावचलो अभियान सुरु केलं जाणार आहे.
त्याची आणखी अमल बजावणी करण्यासाठी राज्याच्या चार झोन प्रभारीना तसे निर्देश पक्ष श्रेष्टी कडुन देण्यात आले आहे. बहुजन समाज पक्षाच्या 39 व्या वर्धापन दिन आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहेन मायावती जी, पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक मा. आकाश आनंद जी, यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मा. खासदार डॉ. अशोक सिध्दार्थ पक्षाचे प्रदेश प्रभारी मा. नितीन सिंग यांच्या निदर्शनाखाली पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांच्या नेतृत्वात राज्यातील चार झोन मध्ये दि. 3 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत गाव चलो संपर्क अभियान अंतर्गत संपुर्ण राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रात एकाच वेळी प्रत्येक विधानसभेत 132 बूथ गठीत करण्याचा बसपाचा निर्धार करण्यात आला आहे.
असे एकुण 3016 बूथ गठीत करण्याचा संकल्प निर्धार त्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्याचा निर्धार कायम केला आहे.
याकरीता राज्यातील विदर्भ विभागाचे प्रदेश प्रभारी सुनिलभाऊ डोंगरे, मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी मनिषभाऊ कावळे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश प्रभारी हुलगेशभाई चलवादी, मुंबई कोकण विभाग प्रदेश प्रभारी प्रा. प्रशांतजी इंगळे यांच्या समन्वयामध्ये राज्यातील चारही झोनमधील सर्व पक्ष महासचिव, सचिव, जिल्हा अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी 3 एप्रिल 2023 पासून ते 30 एप्रिल 2023 पर्यंत या गाव चलो संपर्क अभियानास यशस्वी करुन महामानव बाबासाहेबांची 132 वी जयंती ही वैचारीक पध्दतीने साजरी करण्याचा संकल्प बसपाने केला आहे. यावेळी वैचारीक कटिबध्दतेची जयंती बाबासाहेबांचे हे विचार गाव पातळीवर पोहवण्यासाठी पशिक्षीत बसपा केडर पदाधिकारी प्रयत्न करतील.