संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म का? -बाळासाहेब थोरात

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – तथाकथित नवीन महाराज तयार होतात. त्यातीलच हे बागेश्वर महाराज आहेत. धीरेंद्र शास्त्रीने संत तुकारामांनंतर आता साईहबाबांबद्दल वक्तव्य केलं. साईबाबांबद्दलचे त्याचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे’आपल्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा प्रयत्न असून संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म आहे का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘सध्या नवनवीन महाराज तयार होत आहेत. सरकार त्यांना संरक्षण देतंय. हा देश बंधूभावाने चालवायचा की दंगलीने भरलेला करायचा असं वाटून जाणार हे सगळं वातावरण आहे’.बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, ‘

. तर नवीन निर्माण झालेली आणि द्वेष पसरवणारी ही मंडळी असून सरकारचं या गोष्टींनाप्रोत्साहन असल्यासारखे दिसते, अशी टीका थोरात यांनी केली’ही सगळी मंडळी द्वेष पसरवणारी आणि वर्णभेद निर्माण करणारी आहे

.. यांचा बंदोबस्त सरकार करत नसेल तर लोकांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी धीरेंद्र शास्त्री आणि कालीचरण महाराज यांचा समाचार घेतला आहे.बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला आहे.

यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचे नेतेबाळासाहेब थोरात हेशिर्डीहून समृद्धी महामार्गाने वज्रमुठ सभेसाठी संभाजीनगरकडे रवाना झालेत. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना थोरातांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं

Latest News