राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबधित पुण्यातील कार्यलयावर ED ची करवाई


राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील कार्यलयावर ED ची करवाई
पुणे (परिवर्तनाच सामना ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ९ ठिकाणी आज सकाळपासून पुणे शहरातील सॅलसबरी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह एकूण ९ ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ED पथकाने छापेमारी सुरु केली आहे.
या व्यावसायिकांशी मुश्रीफ यांचे कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.
त्यासंबंधी काही कागदपत्रे मिळतात का याची तपासणी करण्यासाठी ही छापेमारी करण्यात येत असल्याचे समजते.
चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी व निवासस्थानी यापूर्वी जानेवारीमध्येही ईडीने छापे टाकले होते.
हसन मुश्रीफ यांची सीबीआय , ईडीकडून वारंवार चौकशी केली जात आहे.
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना अटक करण्यापासून दिलासा दिला आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना
शेअर्स फसवणुकप्रकरणी ) आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत १०८ जणांनी तक्रारी केल्या आहेत.
ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड विवेक गव्हाणे, आणि जयेश दुधेडिया, या व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थान येथे एकाचवेळी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मोठा फौजफाटा आणण्यात आला आहे.