पतसंस्थांनी डिजिटल व्हावं: विदुला देशपांडे

पतसंस्थांनी डिजिटल व्हावं: विदुला देशपांडे*………छोट्या सहकारी संस्थांवर ग्राहकांचा विश्वास : विदुला देशपांडे

महालक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेचे उद्घाटनपुणे :सध्याच्या कॉर्पोरेट विश्वात पतसंस्थांनी डिजिटल होणं, सुदृढ स्पर्धा करणे, ग्राहकांना उत्तम व्यक्तीगत सेवा देणे आवश्यक असल्याचे मत एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी विदुला देशपांडे यांनी व्यक्त केले.

महालक्ष्मी महिला नागरी पतसंस्था या ब्राह्मण महासंघ संचलित दुसऱ्या पतसंस्थेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.मैत्रेयी पतसंस्थेनंतर ब्राह्मण महासंघ संचालित ही दुसरी पतसंस्था आहे.

पतसंस्थेच्या अध्यक्ष सौ मेघा म्हसवडे, सी.ए. सौ आदिती जोशी,सौ अस्मिता वैद्य, सौ तृप्ती तारे, सौ अनुराधा देशपांडे, सौ आरती जोग, डॉ.आरती कुलकर्णी डॉ. सौ स्वप्नगंधा खरे, सौ आसावरी दिवाण, सौ नूतन इंगळे , सौ जया कुर्लेकर या सर्व संचालिका उपस्थित होत्या.संचालिका सौ विद्या घटवाई यांनी सूत्रसंचालन केले.या प्रसंगी रवींद्र शाळू आणि सहकाऱ्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला.

Latest News