एक फडतूस गृहमंत्री राज्याला मिळाला आहे- उद्धव ठाकरे

ठाणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) राज्यातील एका महिलेला मारहाण करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. इतकंच काय या पीडित महिलेची तक्रार दाखल करून घेतली नाही .एक फडतूस गृहमंत्री राज्याला मिळाला आहे.सत्तांतरानंतर आज उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक दिसले. ठाण्यातील घटनेवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याचे त्यांनी म्हटले.
स्वत: च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिंदे गटाच्या लोकांनी बेदम मारहाण केली. तरी, त्यावर कारवाई होत नाही. स्वत: च्या कुटुंबीयांची काही गोष्ट असली की आरोपीला परराज्यातूनही अटक होते, असेही ठाकरे यांनी म्हटले. फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीदेखील उद्धव यांनी केली.
रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने रोशनी शिंदे प्रकरणी चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला. उद्धव यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायलयाने सरकार नपुंसक असल्याचे म्हटले होते
उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती ‘फडणवीसी’ करत आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.
सोमवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. रोशनी शिंदे यांची आज रुग्णालयात ठाकरे कुटुंबीयांनी भेट घेतली.सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे
. या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिले. तुमची ठाण्यातील नव्हे तर राज्यातील गुंडगिरी मुळासह उखडून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तिथं जाऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विचारपूस केली. ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदे यांची विचारपूस करुन त्यांना दिलासा आणि आधार देण्याचा प्रयत्न केला.
या घटनेवरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रोशनी शिंदे यांना आयसीयूमध्ये दाखल करणं हा दिखावा आहे, त्या गर्भवती नाहीत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. परंतु त्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी ठाण्यात येणं, रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेणं हा राजकारणचा भाग आहे,
असंही शिवसेनेने म्हटलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस करणं यावरुन असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला की, ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ते मागे खंबीरपणे उभे आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.