पुण्यात चक्क राजकीय नेत्यांनाच खंडणी साठी धमक्यांचे फोन, ग्रहखाते झोपलं का?


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत. पुण्यात राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे.त्यामुळं पोलीस आणि ग्रह खाते झोपले कीं काय अशी शंका यायला सुरवात झाली आहे
माजी महापौर आणि भाजप (BJP) नेते मुरलीधर मोहोळ, गणेश बिडकर यांना धमक्यांचे फोन आले होते. ही प्रकरणे काहीशीही ताजी असतानाच आता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनाही धमकीचे फोन येऊ लागले आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना तीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी फोन आला आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने व्हाट्सअपद्वारे खंडणी मागत खंडणी न दिल्यास बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संबंधिताने त्यांच्या मोबाईवर त्यांना मेसेज आणि फोन केला होता. या फोननंतर याप्रकरणी स्वतः अविनाश बागवे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे
मंगळवारी (4 एप्रिल) दुपारी पावणे चारच्या सुमारास बागवे यांना एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून “तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद” करू अशी धमकी दिली. तसेच , “तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो.” असा आणखी एक मेसेज आला.
या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.दरम्यान, बागवे यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.