मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या संगीता डावरे हिचे अखेर पुण्यात निधन….

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलिस पत्नी संगीता हनुमंत डवरे (वय २८) यांचे (काल) मंगळवारी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

त्यांनी २७ मार्च रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एक मार्चला त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सात दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी केली. तपासणी अहवाल निगेटीव्ह आलामंगळवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान संगीता डवरे यांचे निधन झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली

संगीता यांचे पती हनुमंत डावरे हे पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संबंधित वाहनचालकाला सोडून दिल्याचा आरोप संगीता डवरे यांनी केला होता

परंतु याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यांनी २७ मार्च रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता

. त्यांना उपचारासा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले.

त्या उपचारासाठी लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. कोरोनामुळे प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल होण्याबाबत येथील डॉक्टरांनी सल्ला दिला होता

Latest News