तीन गाण्याला तीन लाख घेतले तर माझ्या कार्यक्रम केले नसते….गौतमी पाटील

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – गौतमी पाटील म्हणाली की, ते महाराज आहेत त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. तसेच इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते.

मला तीन गाण्यासाठी कोणीही तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटीलने स्पष्टपणे सांगितले आहे.

तसेच आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचं गौतमी पाटीलने सांगोतले आहे

.गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप करतात.

तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. (Police) बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं.आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती. मात्र, इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटीलने  प्रत्युत्तर दिल आहे

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील तरुणाईला गौतमी पाटीलने वेड लावलं आहे. गौतमीचा कार्यक्रम म्हटला की तुफान गर्दी आणि प्रचंड गर्दीचा माहोल असतो. तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. गौतमी नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. आता याच गौतमीवर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी एक विधान केलं होतं.

काय म्हणाली गौतमी पाटील?

Latest News