‘अंनिस’च्या डॉ. आंबेडकर विशेषांकाचे सूरज एंगडे यांच्या हस्ते शुक्रवारी पुण्यात प्रकाशन.


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
प्रतिनिधी:
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक’ प्रकाशन सोहळा आणि विशेष व्याख्यान शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सायं.५.३० वा. साप्ताहिक साधना कार्यालय, ४३१,शनिवार पेठ, पुणे येथे आयोजित केले आहे.या विशेषांकाचे प्रकाशन ऑक्सफर्ड- हॉर्वर्ड स्कॉलर डॉ. सूरज एंगडे (अमेरिका) यांच्या हस्ते होईल. यावेळी डॉ.एंगडे हे ‘जात आणि अंधश्रद्धा’ या विषयावर व्याख्यान देतील. या विशेषांकात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचा ‘बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधुत्वा विषयी विचार’ हा दिर्घ लेख आहे.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विनोद शिरसाठ (संपादक, साप्ताहिक साधना),डॉ. हमीद दाभोलकर(अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य) हे असणार आहेत.हा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या फेसबुक पेज वरुन प्रक्षेपित केला जाईल.या कार्यक्रमास सर्वांनी जरुर उपस्थित राहवे असे आवाहन अंनिसचे श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात………यांनी केले आहे.